< 约书亚记 15 >

1 犹大支派按着宗族拈阄所得之地是在尽南边,到以东的交界,向南直到寻的旷野。
यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे.
2 他们的南界是从盐海的尽边,就是从朝南的海汊起,
आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.
3 通到亚克拉滨坡的南边,接连到寻,上到加低斯·巴尼亚的南边,又过希斯 ,上到亚达珥,绕到甲加,
ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोन नगराजवळून अद्दारा नगरावरून जाऊन कर्का नगराकडे वळली आहे.
4 接连到押们,通到埃及小河,直通到海为止。这就是他们的南界。
आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी.
5 东界是从盐海南边到约旦河口。北界是从约旦河口的海汊起,
आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.
6 上到伯·曷拉,过伯·亚拉巴的北边,上到吕便之子波罕的磐石;
मग ती सीमा बेथ-होग्ला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबा नगराच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली;
7 从亚割谷往北,上到底璧,直向河南亚都冥坡对面的吉甲;又接连到隐·示麦泉,直通到隐·罗结,
मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.
8 上到欣嫩子谷,贴近耶布斯的南界(耶布斯就是耶路撒冷);又上到欣嫩谷西边的山顶,就是在利乏音谷极北的边界;
मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरूशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाते; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली.
9 又从山顶延到尼弗多亚的水源,通到以弗 山的城邑,又延到巴拉(巴拉就是基列·耶琳);
मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली,
10 又从巴拉往西绕到西珥山,接连到耶琳山的北边(耶琳就是基撒 );又下到伯·示麦过亭纳,
१०मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली.
11 通到以革伦北边,延到施基 ,接连到巴拉山;又通到雅比聂,直通到海为止。
११मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता.
12 西界就是大海和靠近大海之地。这是犹大人按着宗族所得之地四围的交界。
१२आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.
13 约书亚照耶和华所吩咐的,将犹大人中的一段地,就是基列·亚巴,分给耶孚尼的儿子迦勒。亚巴是亚衲族的始祖(基列·亚巴就是希伯 )。
१३आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता.
14 迦勒就从那里赶出亚衲族的三个族长,就是示筛、亚希幔、挞买;
१४मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.
15 又从那里上去,攻击底璧的居民。(这底璧从前名叫基列·西弗。)
१५नंतर तो तेथून दबीर शहरात राहणाऱ्यांवर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.
16 迦勒说:“谁能攻打基列·西弗将城夺取,我就把我女儿押撒给他为妻。”
१६तेव्हा कालेब म्हणाला, “जो किर्याथ-सेफर लढून काबीज करून घेईल, त्यास मी आपली कन्या अखसा पत्नी करून देईन.
17 迦勒兄弟基纳斯的儿子俄陀聂夺取了那城,迦勒就把女儿押撒给他为妻。
१७तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्यास पत्नी करून दिली.”
18 押撒过门的时候,劝丈夫向她父亲求一块田,押撒一下驴,迦勒问她说:“你要什么?”
१८आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे?
19 她说:“求你赐福给我,你既将我安置在南地,求你也给我水泉。”她父亲就把上泉下泉赐给她。
१९अखसाने उत्तर दिले, “मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे तर मला पाण्याचे झरेही द्या.” त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले.
20 以下是犹大支派按着宗族所得的产业。
२०यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;
21 犹大支派尽南边的城邑,与以东交界相近的,就是甲薛、以得、雅姑珥、
२१यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर;
22 基拿、底摩拿、亚大达、
२२कीना व दीमोना व अदादा;
23 基低斯、夏琐、以提楠、
२३आणि केदेश व हासोर व इथनान;
24 西弗、提链、比亚绿、
२४जीफ, टेलेम व बालोथ;
25 夏琐·哈大他、加略·希斯 (加略·希斯 就是夏琐)、
२५हासोर-हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुद्धा म्हणत)
26 亚曼、示玛、摩拉大、
२६अमाम व शमा व मोलादा;
27 哈萨·迦大、黑实门、伯·帕列、
२७आणि हसर-गदा व हेष्मोन व बेथ-पेलेट;
28 哈萨·书亚、别是巴、比斯约他、
२८आणि हसर-शुवाल व बैर-शेबा व बिजोथा;
29 巴拉、以因、以森、
२९बाला, ईयीम व असेम;
30 伊勒多腊、基失、何珥玛、
३०आणि एल्तोलाद व कसील व हर्मा;
31 洗革拉、麦玛拿、三撒拿、
३१आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना;
32 利巴勿、实忻、亚因、临门,共二十九座城,还有属城的村庄。
३२आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे.
33 在高原有以实陶、琐拉、亚实拿、
३३तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा;
34 撒挪亚、隐·干宁、他普亚、以楠、
३४जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम;
35 耶末、亚杜兰、梭哥、亚西加、
३५यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;
36 沙拉音、亚底他音、基底拉、基底罗他音,共十四座城,还有属城的村庄。
३६आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे;
37 又有洗楠、哈大沙、麦大·迦得、
३७सनान व हदाशा व मिग्दल-गाद;
38 底连、米斯巴、约帖、
३८दिलन, मिस्पा व यकथेल;
39 拉吉、波斯加、伊矶伦、
३९लाखीश व बसकाथ व एग्लोन;
40 迦本、拉幔、基提利、
४०कब्बोन व लहमाम व किथलीश;
41 基低罗、伯·大衮、拿玛、玛基大,共十六座城,还有属城的村庄。
४१गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे.
42 又有立拿、以帖、亚珊、
४२लिब्ना व एथेर व आशान;
43 益弗他、亚实拿、尼悉、
४३इफ्ताह व अष्णा व नजीब;
44 基伊拉、亚革悉、玛利沙,共九座城,还有属城的村庄。
४४आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे.
45 又有以革伦和属以革伦的镇市村庄;
४५एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे;
46 从以革伦直到海,一切靠近亚实突之地,并属其地的村庄。
४६एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह.
47 亚实突和属亚实突的镇市村庄;迦萨和属迦萨的镇市村庄;直到埃及小河,并大海和靠近大海之地。
४७अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.
48 在山地有沙密、雅提珥、梭哥、
४८आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो;
49 大拿、基列·萨拿(基列·萨拿就是底璧)、
४९दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर;
50 亚拿伯、以实提莫、亚念、
५०अनाब व एष्टमो व अनीम,
51 歌珊、何伦、基罗,共十一座城,还有属城的村庄。
५१आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी,
52 又有亚拉、度玛、以珊、
५२अरब व दूमा व एशान,
53 雅农、伯·他普亚、亚非加、
५३यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका,
54 宏他、基列·亚巴(基列·亚巴就是希伯 )、洗珥,共九座城,还有属城的村庄。
५४हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.
55 又有玛云、迦密、西弗、淤他、
५५मावोन, कर्मेल व जीफ व यूटा,
56 耶斯列、约甸、撒挪亚、
५६इज्रेल व यकदाम व जानोहा,
57 该隐、基比亚、亭纳,共十座城,还有属城的村庄。
५७काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी.
58 又有哈忽、伯·夙、基突、
५८हल्हूल, बेथ-सूर व गदोर,
59 玛腊、伯·亚诺、伊勒提君,共六座城,还有属城的村庄。
५९माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
60 又有基列·巴力(基列·巴力就是基列·耶琳)、拉巴,共两座城,还有属城的村庄。
६०किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.
61 在旷野有伯·亚拉巴、密丁、西迦迦、
६१रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
62 匿珊、盐城、隐·基底,共六座城,还有属城的村庄。
६२आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
63 至于住耶路撒冷的耶布斯人,犹大人不能把他们赶出去,耶布斯人却在耶路撒冷与犹大人同住,直到今日。
६३तथापि यरूशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरूशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.

< 约书亚记 15 >