< 5 Mosebog 3 >

1 Derpå brød vi op og drog mod Basan. Og Kong Og af Basan rykkede med alle sine Krigere ud imod os til Kamp ved Edrei.
मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा बाशानाचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी एद्रई येथे चाल करून आली.
2 Da sagde HERREN til mig: "Frygt ikke for ham, thi jeg giver ham i din Hånd tillige med hele hans Folk og Land, og du skal gøre ved ham, som du gjorde ved Sihon, Amoriterkongen i Hesjbon."
परमेश्वर मला म्हणाला, त्यास भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्या हाती दिलेली आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे केले तसेच याचेही करा.
3 Så gav HERREN vor Gud også kong Og af Basan og alle hans Krigere i vor Hånd, og vi slog ham, så ikke en eneste undslap.
आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्यास असा मार दिला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही.
4 Vi indtog dengang alle hans Byer; der var ikke een By, vi ikke fratog dem, i alt tresindstyve Byer, hele Landskabet Argob, Ogs Kongerige i Basan,
मग ओगच्या ताब्यातील सर्वच्या सर्व साठ नगरे म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला, बाशानातले ओगचे राज्य ते हेच.
5 lutter Byer, der var befæstet med høje Mure, Porte og Portslåer, foruden de mange åbne Byer;
या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती. त्यांना उंच भिंती, वेशी, मजबूत अडसर होते. याव्यतिरिक्त तट नसलेली खेडी पुष्कळच होती.
6 og vi lagde Band på dem, ligesom vi havde gjort ved Kong Sihon i Hesjbon, i enhver By lagde vi Band på Mænd, Kvinder og Børn;
हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही समुळ नाश केला. पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे कोणालाही म्हणून शिल्लक ठेवले नाही.
7 men alt Kvæget, og hvad vi røvede fra Byerne, tog vi selv som Bytte.
गुरेढोरे आणि नगरातील लूट मात्र घेतली.
8 Således erobrede vi dengang Landet fra de to Amoriterkonger hinsides Jordan fra Arnonfloden til Hermonbjerget
“अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या दोन राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला, तो म्हणजे यार्देनच्या पूर्वेकडचा, आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा.
9 Zidonierne kalder Hermon Sirjon, men Amoriterne kalder det Senir
(सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.)
10 alle Byerne på Højsletten, hele Gilead og hele Basan lige til Salka og Edrei, Byer i kong Ogs Rige i Basan.
१०माळावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत तसेच बाशानच्या ओगच्या राज्यातील सलेखा व एद्रई सकट सर्व प्रांत आम्ही काबीज केला.”
11 Thi Kong Og af Basan var den eneste, der endnu var tilbage af Refaiterne; hans Kiste, en Jernkiste, står jo endnu i Rabba i Ammon, ni Alen lang og fire Alen bred efter vanligt Mål.
११रेफाई लोकांपैकी बाशानाचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या राब्बा नगरात तो अजूनही आहे.
12 Således tog vi dengang dette Land i Besiddelse. Landet fra Aroer, der ligger ved Arnonfloden, og Halvdelen af Gileads Bjerge med Byerne der gav jeg Rubeniterne og Gaditerne;
१२“तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असाः आर्णोन खोऱ्यातील अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे.
13 men Resten af Gilead og hele Basan, Ogs Rige, gav jeg til Manasses halve Stamme, hele Landskabet Argob. (Det er hele dette Basan, man kalder Refaiterland.)
१३गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.” बाशान म्हणजे ओगचे राज्य त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात (ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात.
14 Manasses Søn Jair erobrede hele Landskabet Argob indtil Gesjuriternes og Ma'akatiternes Egne og kaldte dem Ja'irs Teltbyer efter sig selv, som de hedder endnu den Dag i Dag.
१४मनश्शेचा मुलगा याईर याने गशूरी आणि माकाथी यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला. आणि बाशानाला आपले नाव दिले म्हणून आजही लोक त्यास हव्वोथ-याईराची नगरेच म्हणतात.)
15 Og Makir gav jeg Gilead;
१५आणि गिलाद प्रदेश मी माखीर याला दिला.
16 og Rubeniterne og Gaditerne gav jeg Landet fra Gilead til Arnonfloden med Dalens Midtlinie som Grænse og til Jabbokfloden, Ammoniternes Grænse,
१६त्याचा पुढचा प्रदेश रऊबेनी आणि गादी ह्यांना गिलादापासून आर्णोन खोऱ्याच्या मध्यभागापासून अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्याची सरहद्द ठरवली.
17 og Arabalavningen med Jordan som Grænse fra Kinneret til Arabaeller Salthavet ved Foden af Pisgas Skrænter mod Øst.
१७तसेच किन्नेरेथापासुन अरबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र ईथपर्यंतचा पिसगाची उतरण व त्याच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पुर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला.
18 Dengang gav jeg eder følgende Påbud: "HERREN eders Gud har givet eder dette Land i Eje; men I skal, så mange krigsdygtige Mænd I er, drage væbnede i Spidsen for eders Brødre Israelitterne
१८त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश “तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हवाली केला आहे. पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन, हत्यारबंद होऊन आपल्या इस्राएली भाऊबंदाना पलीकडे घेऊन जावे.
19 kun eders Kvinder, Børn og Kvæg (jeg ved, at I har meget Kvæg) skal blive tilbage i de Byer, jeg giver eder
१९तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे आणि गुरेढोरे (ती बरीच आहेत हे मला माहीत आहे) इथेच मी दिलेल्या नगरात राहतील.
20 indtil HERREN bringer eders Brødre til Hvile ligesom eder, og de også får taget det Land i Besiddelse, som HERREN eders Gud vil give dem hinsides Jordan; så kan enhver af eder vende tilbage til den Ejendom, jeg har givet eder!"
२०आणि तुमच्याचप्रमाणे तुमच्या भाऊबंदांना परमेश्वर विसावा देईल, व तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना देऊ केलेला यार्देनेपलीकडचा देश तेही ताब्यात घेतील; त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हास दिलेला आहे तेथे तुम्ही सर्व आपापल्या वतनावर परत या.”
21 Og Josua gav jeg dengang følgende Påbud: "Du har med egne Øjne set alt, hvad HERREN eders Gud har gjort ved disse to Konger; således vil HERREN også gøre ved alle de Riger, du drager over til.
२१मग मी यहोशवाला असे सांगितले की, “या दोन राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिलेच. पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील.
22 Du skal ikke frygte for dem; thi HERREN eders Gud vil selv kæmpe for eder!"
२२तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे.”
23 Og dengang bad jeg således til HERREN:
२३मग त्या वेळी मी परमेश्वरास विनंती करून म्हणालो,
24 "Herre, HERRE! Du har begyndt at vise din Tjener din Storhed og din stærke Hånd! Thi hvem er den Gud i Himmelen og på Jorden, der kan gøre sådanne Gerninger og Storværker som du?
२४“हे प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या दासास आपला महान व सामर्थ्यशाली हात दाखवत आहेस. तुझ्यासारखे थोर प्रताप करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर दुसरा कोण आहे?
25 Lad mig da få Lov at drage over og se det herlige Land hinsides Jordan, det herlige Bjergland og Libanon!"
२५तेव्हा कृपाकरून मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.”
26 Men HERREN var vred på mig for eders Skyld og hørte mig ikke, men han sagde til mig: "Lad det være nok, tal ikke mere til mig om den Sag;
२६पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, “पुरे, आता एक शब्दही बोलू नको.
27 men stig op på Pisgas Tinde, løft dit Blik mod Vest og Nord, mod Syd og Øst, og tag det i Øjesyn. Thi du kommer ikke til at drage over Jordan dernede;
२७पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्वकाही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस.
28 men sig Josua, hvad han skal, og sæt Mod i ham og styrk ham, thi det bliver ham, der skal drage over i Spidsen for dette Folk, og ham, der skal give dem det Land, du ser, i Eje."
२८यहोशवाला मात्र तू सूचना दे. त्यास उत्तेजन देऊन समर्थ कर. कारण तोच लोकांस पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहण्यासाठी मिळवून देईल.”
29 Så blev vi i Dalen lige over for Bet Peor.
२९“आणि आम्ही बेथ-पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.”

< 5 Mosebog 3 >