< Rapar Mar Chik 11 >

1 Heruru Jehova Nyasaye ma Nyasachu kendo urit dwarone, buchene, kod chikene ndalo duto.
म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यांच्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा.
2 Paruru kawuononi puonj mane uyudo kuom Jehova Nyasaye ma Nyasachu nimar kata obedo ni nyithindu pok ongʼeyo kata neno puonjno, to un to ungʼeye. Bende paruru duongʼ mar Jehova Nyasaye gi tekone kod bat morie;
परमेश्वराने तुमच्यासाठी केलेले सर्व प्रताप आज आठवा. हे मी तुम्हासच सांगत आहे. तुमच्या मुलाबाळांना नव्हे. कारण त्यांनी या शिस्तींपैकी काहीच पाहिले किंव्हा अनुभवले नाही. तुमचा देव परमेश्वर त्याची थोरवी, त्याचे सामर्थ्य व पराक्रमी हात व ऊगारलेला बाहू ह्याच्याद्ववारे,
3 kaachiel gi ranyisi mane otimo kod honni mane onyiso e dier jo-Misri, ne Farao ruodh Misri kod pinye duto.
मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश ह्याला त्याने कोणती चिन्हे व चमत्कार दाखवली हे तुम्ही पाहिलेच आहे.
4 Bende nuneno gima notimone jolwenj Misri, faresegi kod gechegi kane gilawou mi Nam Makwar oimogi kendo mi Jehova Nyasaye otiekogi pep.
मिसरचे सैन्य, त्यांचे घोडे, रथ यांची कशी दैना झाली, तुमचा ते पाठलाग करत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला हेही तुम्ही पाहिले. परमेश्वराने त्यांना पूर्ण नेस्तनाबूत केले.
5 Nyithindu ne ok oneno gima Jehova Nyasaye notimonu e thim nyaka ne uchopo kama untiereni.
तुम्ही येथे येईपर्यंत रानावनातून तुम्हास त्याने कसे आणले हे तुम्हास माहीत आहेच.
6 Kendo gima ne otimone Dathan kod Abiram yawuot Eliab mawuok e dhood Reuben kane piny oyawo dhoge e dieru tir e kind jo-Israel duto ma omwonyogi duto kod joutgi, hembegi kod gik moko duto ma mekgi.
त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हास माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गुरेढोरे यांना सर्व इस्राएलादेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.
7 To un ema ne uneno giwengeu gik madongo duto mane Jehova Nyasaye otimo.
परमेश्वराची ही महान कृत्ये तुमच्या मुलांनी नाही, तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलीत.
8 Rituru chike duto ma amiyou kawuononi mondo ubed gi teko kendo ukaw piny man loka mar Jordan mudhi kawono;
तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल.
9 kendo mondo udagi amingʼa e piny mane Jehova Nyasaye osingo ne kwereu ni nomigi kod nyikwagi ma en piny maber mopongʼ gi chak kod mor kich.
त्या देशात तुम्ही चिरकाल रहाल. तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या वंशजांना दुधामधाचा प्रदेश द्यायचे परमेश्वराने वचन दिले आहे. या प्रदेशात सुबत्ता आहे.
10 Piny ma udonjoe mondo ukaw ok chal gi piny Misri muwuokie, ma en kama nuchwoyoe kothe ka uolonegi pi mana kaka iolone puoth alot.
१०तुम्ही जेथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही भाजीच्या मळ्याप्रमाणे बी पेरून पायांनी जमीनीला पाणी देत होता.
11 To piny ma ungʼado Jordan mondo udhi ukaw en piny gode kod holo ma mwonyo pi moa e polo.
११पण आता मिळणारी जमीन तशी नाही. त्या देशामध्ये डोंगर आणि खोरी आहेत. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी या भूमीला मिळते.
12 En piny ma Jehova Nyasaye ma Nyasachu biro ritoue; kendo orange pile ka pile higa ngima.
१२तुमचा देव परमेश्वर त्या जमिनीची काळजी घेतो. वर्षांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची या जमिनीवर कृपादृष्टी असते.
13 Koro ka urito chike mamiyou adimba kawuono, ka uhero Jehova Nyasaye ma Nyasachu kendo tiyone gi chunyu duto kod ngimau duto,
१३परमेश्वर म्हणतो, ज्या आज्ञा मी आज तुम्हास देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मन: पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा.
14 to abiro oro koth e pinyu e ndalo mowinjore e ndalo oro kod ndalo chwiri, mondo uyud cham, gi mzabibu kod mo.
१४तसे वागलात तर तुमच्या भूमीवर मी योग्यवेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हास धान्य, नवीन द्राक्षरस, तेल यांचा साठा करता येईल.
15 Abiro chiwo lum ne jamni mau kendo unuchiem ma uyiengʼ.
१५माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हास खाण्याकरता पुष्कळ असेल.
16 Beduru motangʼ mondo pachu kik maki gi gik ma kamago ma ulam nyiseche mamoko ka ukulorenegi.
१६पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका.
17 Mirimb Nyasaye nyalo lwar kuomu, ma olor ranga polo, mi koth bed maonge kendo puothe ok nochieg cham, ma uduto utho e piny maber ma Jehova Nyasaye miyou.
१७तसे केलेत तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हास देत आहे त्यामध्ये तुम्हास लवकरच मरण येईल.
18 Kanuru wechenagi e chunyu kod pachu, twegiuru e bedeu ka ranyisi kendo e pat wengeu.
१८म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या हृदयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर चिन्हादाखल बांधा व कपाळावर लावा.
19 Puonjuru nyithindu wechegi, ka uwuoyo kuomgi ka ubet e dala, ka uwuotho e yo, ka unindo kata ka uchiewo.
१९आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा.
20 Ndikgiuru ewi dhoutu kendo e rangeyeu,
२०घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा.
21 mondo ndalo magu kod mag nyithindu omedre e piny mane Jehova Nyasaye osingore ni nomi nyithindu, mondo obed maru nyaka chiengʼ.
२१म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत रहाल.
22 Ka urito adimba chike duto ma amiyou mondo uluw mi uhero Jehova Nyasaye ma Nyasachu ka uwuotho e yorene kendo ka urito wechene,
२२मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा.
23 to Jehova Nyasaye biro riembo ogendinigi duto e nyimu, kendo ubiro kawo pinje madongo kendo maroteke moloyou.
२३म्हणजे तुम्ही जाल तेव्हा तेथील इतर राष्ट्रांना परमेश्वर तेथून हुसकावून लावेल. तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सामर्थ्यवान राष्ट्रावर तुम्ही ताबा मिळवाल.
24 Kamoro amora ma unyono, nobed maru, tongʼ maru noyarre koa e thim mar Lebanon kokalo Aora mar Yufrate nyaka nam man yo podho chiengʼ.
२४जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल.
25 Onge ngʼama nosiru. Jehova Nyasaye ma Nyasachu mana kaka osechikou, biro kelo luoro kod kibaji e piny duto kamoro amora ma udhiyoe.
२५कोणीही तुमचा सामना करु शकणार नाही. परमेश्वर देवाने तुम्हास सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जेथे जेथे जाल तेथे लोकांस तुमची दहशत वाटेल.
26 Winjuru, kawuononi aketo gweth kod kwongʼ e nyimu.
२६आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा.
27 Ka urito chike Jehova Nyasaye ma Nyasachu ma amiyou kawuononi, to unuyud gweth.
२७आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा तुम्हास सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हास आशीर्वाद मिळेल.
28 Ka ok uluwo chike Jehova Nyasaye ma Nyasachu mi ulokoru uweyo yore ma amiyou kawuono, kendo ka uluwo nyiseche mamoko ma ok usengʼeyo, to unuyud kwongʼ.
२८पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळालात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वरास तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हास ओळख नाही.
29 Ka Jehova Nyasaye ma Nyasachu osekelou e piny mudhiye mondo ukaw obed maru, to nyaka uhul weche gweth e got Gerizim, to weche mag kwongʼ to uhul e got Ebal.
२९तुमचा देव परमेश्वर तुम्हास त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लवकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा.
30 Kaka ungʼeyo, godegi ni yo podho chiengʼ mar holo mar Jordan kama jo-Kanaan odakie. Gin gode mantiere Araba but Gilgal kama yiende madongo mag More nitie.
३०हे डोंगर यार्देन नदीच्या पलीकडे, सुर्य माळवतो त्या दिशेला अराबात राहणाऱ्या कनानी लोकांच्या प्रदेशात, पश्चिमेकडे गिलगाल शहराजवळच्या मोरे येथील ओक वृक्षांजवळ आहेत.
31 Uchiegni ngʼado Jordan mondo ukaw piny ma Jehova Nyasaye ma Nyasachu miyou. Ka usekawe ma udakie,
३१तुम्ही यार्देन नदी पार करून जाल. तुमचा देव परमेश्वर देत असलेली जमीन तुम्ही ताब्यात घ्याल. ती तुमची असेल. त्यामध्ये वस्ती कराल तेव्हा
32 to neuru ni uluwo chike duto kod buche ma amiyou kawuononi.
३२मी आज सांगितलेले नियम व विधी यांचे काळजीपूर्वक पालन करा.

< Rapar Mar Chik 11 >