< Kings II 13 >

1 And it happened after this that Abessalom the son of David had a very beautiful sister, and her name [was] Themar; and Amnon the son of David loved her.
दावीदाचा मुलगा अबशालोम याला तामार नावाची बहीण होती. ती दिसायला फार सुदंर होती. दावीदाला अम्नोन नावाचा आणखी एक मुलगा होता.
2 And Amnon was distressed even to sickness, because of Themar his sister; for she was a virgin, and it seemed very difficult for Amnon to do anything to her.
त्याचे तामारेवर प्रेम होते तामार कुमारिका होती तिच्याशी वावगे वागण्याची त्याची छाती नव्हती. पण तिच्याविषयी त्याच्या मनात अभिलाषा होती. तिच्याविषयी विचार करून तो आजारी पडला.
3 And Amnon had a friend, and his name [was] Jonadab, the son of Samaa the brother of David: and Jonadab [was] a very cunning man.
अम्नोनाला योनादाब नावाचा मित्र होता. दावीदाचा भाऊ शिमा याचा हा मुलगा. योनादाब धूर्त होता.
4 And he said to him, What ails thee that thou art thus weak? O son of the king, morning by morning? wilt thou not tell me? and Ammon said, I love Themar the sister of my brother Abessalom.
तो अम्नोनाला म्हणाला, दिवसें दिवस तू क्षीण होत चालला आहेस. तू तर राजपुत्र! खायची प्यायची रेलचेल असताना तू असा अशक्त का होत आहेस? माझ्यापाशी मनमोकळे कर. तेव्हा अम्नोन योनादाबाला म्हणाला, माझे तामार वर प्रेम आहे, पण ती माझा सावत्र भाऊ अबशालोमची बहीण आहे.
5 And Jonadab said to him, Lie upon thy bed, and make thyself sick, and thy father shall come in to see thee; and thou shalt say to him, Let, I pray thee, Themar my sister come, and feed me with morsels, and let her prepare food before my eyes, that I may see and eat at her hands.
योनादाब यावर अम्नोनाला म्हणाला, आता तू आजारी पडल्याचे सोंग कर आणि झोपून जा. मग वडील भेटायला आले की त्यांना सांग, तामारला माझ्याकडे येऊ द्या. तिने मला खायला घालू द्या. माझ्या समोरच तिला एखादा खाद्य पदार्थ तयार करू द्या. मग तो तिच्या हातून मी खाईन.
6 So Ammon lay down, and made himself sick; and the king came in to see him: and Amnon said to the king, Let, I pray thee, my sister Themar come to me, and make a couple of cakes in my sight, and I will eat them at her hand.
तेव्हा अम्नोन आजारी असल्याचे भासवून बिछान्यावर झोपून राहिला. राजा दावीद त्याच्या समाचाराला आला. त्यास तो म्हणाला, तामारला माझ्याकडे पाठवा तिला इथे माझ्यादेखत दोन पोळ्या करू द्या आणि मला भरवू द्या. मग मी त्या खाईन.
7 And David sent to Themar to the house, saying, Go now to thy brother's house, and dress him food.
दावीदाने तामारच्या दालनात तसा निरोप पाठवायची व्यवस्था केली. तामारला नोकराने निरोप दिला, आपला भाऊ अम्नोन याच्या घरी जाऊन त्याच्यासाठी खायला कर.
8 And Themar went to the house of her brother Amnon, and he [was] lying down: and she took the dough and kneaded it, and made cakes in his sight, and baked the cakes.
तामार तेव्हा आपला भाऊ अम्नोन याच्याकडे गेली. तो पलगांवरच होता. तिने थोडी कणीक घेऊन ती चांगली मळून पोळ्या केल्या. अम्नोन हे सर्व पाहत होता.
9 And she took the frying pan and poured them out before him, but he would not eat. And Amnon said, Send out every man from about me. And they removed every man from about him.
पोळ्या तयार झाल्यावर तव्यावरून काढून तिने त्या अम्नोनासाठी ताटात वाढल्या. पण अम्नोन ते काही केल्या खाईना मग आपल्या नोकारांना त्याने बाहेर निघून जाण्याची आज्ञा देऊन तिथून घालवले. सर्व नोकर बाहेर पडले.
10 And Amnon said to Themar, Bring in the food into the closet, and I will eat of thy hand. And Themar took the cakes which she had made, and brought them to her brother Amnon into the chamber.
१०यानंतर अम्नोन तामारेस म्हणाला, ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव. तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली.
11 And she brought [them] to him to eat, and he caught hold of her, and said to her, Come, lie with me, my sister.
११त्यास ती भरवू लागली. तोच त्याने तिचा हात धरला. तिला तो म्हणाला, हे बहिणी, ये आणि माझ्याजवळ झोप.
12 And she said to him, Nay, my brother, do not humble me, for it ought not to be so done in Israel; do not this folly.
१२तामार त्यास म्हणाली, भाऊ नको! अशी बळजबरी तू माझ्यावर करू नकोस. ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. असल्या भयंकर गोष्टी इस्राएलमघ्ये कदापि घडता कामा नयेत.
13 And I, whither shall I remove my reproach? and thou shalt be as one of the fools in Israel. And now, speak, I pray thee, to the king, for surely he will not keep me from thee.
१३मला कायम या लाजिरवाण्या गोष्टीचा कलंक लागेल. लोकांच्या दृष्टीने तू इस्राएलामधल्या अनेक मूर्खांपैकी एक ठरशील. तू कृपा करून राजाशी बोल. तो तुला माझ्याशी लग्न करायला अनुमती देईल.
14 But Amnon would not hearken to her voice; and he prevailed against her, and humbled her, and lay with her.
१४पण अम्नोनाने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले शारीरिक दृष्ट्याही तो तिच्यापेक्षा शक्तीवान होता. तिला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला.
15 Then Amnon hated her with very great hatred; for the hatred with which he hated her was greater than the love with which he had loved her, for the last wickedness was greater than the first: and Amnon said to her, Rise, and be gone.
१५मग तिच्याबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला. पूर्वी त्याचे तिच्यावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा अधिक तो आता तिचा द्वेष करू लागला. त्याने तिला तात्काळ तिथून निघून जायला सांगितले.
16 And Themar spoke to him concerning this great mischief, greater, [said she], than the other that thou didst me, to send me away: but Amnon would not hearken to her voice.
१६तामार त्यास म्हणाली, नाही, आता माझी अशी रवानगी करू नकोस. ते तर तुझ्या या आताच्या कृत्यापेक्षाही वाईट होईल. पण त्याने तिचे म्हणणे झिटकारून टाकले.
17 And he called his servant who had charge of the house, and said to him, Put now this [woman] out from me, and shut the door after her.
१७नोकरांना बोलावून तो म्हणाला, हिला आताच्या आता इथून बाहेर काढा आणि दार बंद करून टाका.
18 And she had on her a variegated robe, for so were the king's daughters that were virgins attired in their apparel: and his servant led her forth, and shut the door after her.
१८तेव्हा अम्नोनाच्या नोकराने तिला तेथून बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला. तामरने रंगीबेरंगी, पट्टट्यापट्ट्यांचा पायघोळ अंगरखा घातला होता. राजकन्या लग्नापूर्वी असा पोषाख करत असत.
19 And Themar took ashes, and put them on her head; and she rent the variegated garment that was upon her: and she laid her hands on her head, and went crying continually.
१९तामारने उद्विग्न मन: स्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्यात राख घालून घेतली. डोक्यावर हात आपटून ती शोक करू लागली.
20 And Abessalom her brother said to her, Has thy brother Amnon been with thee? now then, my sister, be silent, for he is thy brother: be not careful to mention this matter. So Themar dwelt as a widow in the house of her brother Abessalom.
२०तेव्हा अबशालोम या तिच्या भावाने तिला विचारले, तू अम्नोनकडे गेली होतीस का? त्याने तुला त्रास दिला का? आता तू शांत हो तो तुझा भाऊ आहे. तेव्हा त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू. तू याचा त्रास करून घेऊ नकोस, यावर तामार काही बोलली नाही. ती शांतपणे अबशालोमच्या घरी राहायला गेली.
21 And king David heard of all these things, and was very angry; but he did not grieve the spirit of his son Amnon, because be loved him, for he was his first-born.
२१हे सर्व राजा दावीदाच्या कानावर गेले व तो संतापला.
22 And Abessalom spoke not to Amnon, good or bad, because Abessalom hated Amnon, on account of his humbling his sister Themar.
२२अबशालोमला अम्नोनाचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनाशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनाने आपली बहिण तामार हिच्याशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता.
23 And it came to pass at the end of two whole years, that they were shearing [sheep] for Abessalom in Belasor near Ephraim: and Abessalom invited all the king's sons.
२३दोन वर्षानंतर मेंढरांची लोकर कातरणारे अबशालोमचे काही लोक एफ्राइम जवळील बालहासोरमध्ये आलेले होते अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले.
24 And Abessalom came to the king, and said, Behold, thy servant has a sheep-shearing; let now the king and his servants go with thy servant.
२४अबशालोम राजाकडे जाऊन म्हणाला, मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत आपल्या नोकरासहीत येऊन हे दृश्य पाहा.
25 And the king said to Abessalom, Nay, my son, let us not all go, and let us not be burdensome to thee. And he pressed him; but he would not go, but blessed him.
२५तेव्हा राजा दावीद त्यास म्हणाला, मुला आम्ही सर्व जण येणे काही शक्य नाही. तुझ्यावरही त्याचा भार पडेल. अबशालोमने दावीदाची खूप आर्जवे केली. परंतु दावीद गेला नाही. पण त्याने आपले आशीर्वाद दिले.
26 And Abessalom said to him, And if not, let I pray thee, my brother Amnon go with us. And the king said to him, Why should he go with thee?
२६अबशालोम म्हणाला, तुम्ही नाही तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी पाठवा. राजा दावीद म्हणाला, तो तरी तुला कशासाठी बरोबर यायला हवा आहे?
27 And Abessalom pressed him, and he sent with him Amnon and all the king's sons; and Abessalom made a banquet like the banquet of the king.
२७पण अबशालोमने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी, अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अबशालोमाबरोबर जायला राजा दावीदाने संमती दिली.
28 And Abessalom charged his servants, saying, Mark when the heart of Amnon shall be merry with wine, and I shall say to you, Smite Amnon, and slay him: fear not; for is it not I that command you? Be courageous, and be valiant.
२८अबशालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, अम्नोनावर नजर ठेवा. मद्याचा आनंद घेत त्यास जेव्हा त्याची नशा चढेल, तेव्हा मी तुम्हास संकेत करीन. मग त्याच्यावर हल्ला करून तुम्ही त्यास ठार करा शिक्षेची भीती बाळगू नका. अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात. धैर्याने आणि खंबीरपणाने वागा.
29 And the servants of Abessalom did to Amnon as Abessalom commanded them: and all the sons of the king rose up, and they mounted every man his mule, and fled.
२९तेव्हा अबशालोमच्या नोकरांनी त्याचा शब्द पाळला. अम्नोनाला त्यांनी ठार केले. पण दावीदाची बाकीची सर्व मुले निसटली. आपापल्या खेचरावर बसून ती पळाली.
30 And it came to pass, when they were in the way, that a report came to David, saying, Abessalom has slain all the king's sons, and there is not one of them left.
३०राजाचे पुत्र नगराच्या वाटेवर असतानाच राजा दावीदाला या घडामोडीची खबर मिळाली. ती अशी, अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ठार केले कोणालाही त्यातून वगळले नाही.
31 Then the king arose, and rent his garments, and lay upon the ground: and all his servants that were standing round him rent their garments.
३१राजा दु: खाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली.
32 And Jonadab the son of Samaa brother of David, answered and said, Let not my Lord the king say that he has slain all the young men the sons of the king, for Amnon only of them all is dead; for he was appointed [to death] by the mouth of Abessalom from the day that he humbled his sister Themar.
३२परंतु दावीदाचा भाऊ शिमा याचा मुलगा योनादाब राजाला म्हणाला, सर्व मुले गेली असे समजू नका. फक्त अम्नोन मरण पावला आहे. अम्नोनाने तामार या आपल्या बहिणीवर बलात्कार केला तेव्हा पासूनच अबशालोमच्या डोक्यात ही योजना तयार होत होती.
33 And now let not my lord the king take the matter to heart, saying, All the king's sons are dead: for Amnon only of them is dead.
३३स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करून समजू नका. फक्त अम्नोन गेला.
34 And Abessalom escaped: and the young man the watchman, lifted up his eyes, and looked; and, behold, much people went in the way behind him from the side of the mountain in the descent: and the watchman came and told the king, and said, I have seen men by the way of Oronen, by the side of the mountain.
३४अबशालोमने पळ काढला. नगराच्या वेशीवर एक पहारेकरी उभा होता. त्याने डोंगरापलीकडून बऱ्याच लोकांस येताना पाहिले.
35 And Jonadab said to the king, Behold, the king's sons are present: according to the word of thy servant, so has it happened.
३५तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, बघा मी म्हटले ते खरे आहे की नाही? हे पाहा राजपुत्र येत आहेत.
36 And it came to pass when he had finished speaking, that, behold, the king's sons came, and lifted up their voices and wept: and the king also and all his servants wept with a very great weeping.
३६योनादाबाचे बोलणे संपत आले तोच राजपुत्र समोर आले. ते सुध्दा मोठ्याने आक्रोश करत होते. दावीद आणि त्याचे आधिकारीही शोक करू लागले. रडण्याचा हलकल्लोळ उडाला.
37 But Abessalom fled, and went to Tholmi son of Emiud the king of Gedsur to the land of Chamaachad: and king David mourned for his son continually.
३७दावीद अम्नोनासाठी रोज अश्रू ढाळे. अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला.
38 So Abessalom fled, and departed to Gedsur, and was there three years.
३८मग अबशालोम गेशूरच्या राजाकडे पळून गेला, तिथे तो तीन वर्षे राहिला.
39 And king David ceased to go out after Abessalom, for he was comforted concerning Amnon, touching his death.
३९राजा दावीद अम्नोनाच्या दु: खातून सावरला, पण अबशालोमच्या आठवणीने तो व्याकुळ होत असे.

< Kings II 13 >