< इब्री 4 >

1 म्हणून देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी देवापासून मिळालेले अभिवचन अजूनही आहे आणि यास्तव तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.
អបរំ តទ្វិឝ្រាមប្រាប្តេះ ប្រតិជ្ញា យទិ តិឞ្ឋតិ តហ៌្យស្មាកំ កឝ្ចិត៑ ចេត៑ តស្យាះ ផលេន វញ្ចិតោ ភវេត៑ វយម៑ ឯតស្មាទ៑ ពិភីមះ។
2 कारण आम्हास सुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांस सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही.
យតោ ៜស្មាកំ សមីបេ យទ្វត៑ តទ្វត៑ តេឞាំ សមីបេៜបិ សុសំវាទះ ប្រចារិតោ ៜភវត៑ កិន្តុ តៃះ ឝ្រុតំ វាក្យំ តាន៑ ប្រតិ និឞ្ផលម៑ អភវត៑, យតស្តេ ឝ្រោតារោ វិឝ្វាសេន សាទ៌្ធំ តន្នាមិឝ្រយន៑។
3 ज्या आपण विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. असे देवाने म्हणले आहे. “म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो, ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत” जगाच्या निर्मितीपासूनचे त्याचे काम संपलेले होते तरी तो असे म्हणाला.
តទ៑ វិឝ្រាមស្ថានំ វិឝ្វាសិភិរស្មាភិះ ប្រវិឝ្យតេ យតស្តេនោក្តំ, "អហំ កោបាត៑ ឝបថំ ក្ឫតវាន៑ ឥមំ, ប្រវេក្ឞ្យតេ ជនៃរេតៃ រ្ន វិឝ្រាមស្ថលំ មម។ " កិន្តុ តស្យ កម៌្មាណិ ជគតះ ស្ឫឞ្ដិកាលាត៑ សមាប្តានិ សន្តិ។
4 कारण पवित्र शास्त्रात तो सातव्या दिवसाबद्दल असे बोलला आहे कीः “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.”
យតះ កស្មិំឝ្ចិត៑ ស្ថានេ សប្តមំ ទិនមធិ តេនេទម៑ ឧក្តំ, យថា, "ឦឝ្វរះ សប្តមេ ទិនេ ស្វក្ឫតេភ្យះ សវ៌្វកម៌្មភ្យោ វិឝឝ្រាម។ "
5 आणि पुन्हा तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत.”
កិន្ត្វេតស្មិន៑ ស្ថានេ បុនស្តេនោច្យតេ, យថា, "ប្រវេក្ឞ្យតេ ជនៃរេតៃ រ្ន វិឝ្រាមស្ថលំ មម។ "
6 ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासामुळे त्यामध्ये प्रवेश झाला नाही, तरी हे खरे आहे की, काही जणांचा त्या विसाव्यात प्रवेश होणार आहे.
ផលតស្តត៑ ស្ថានំ កៃឝ្ចិត៑ ប្រវេឞ្ដវ្យំ កិន្តុ យេ បុរា សុសំវាទំ ឝ្រុតវន្តស្តៃរវិឝ្វាសាត៑ តន្ន ប្រវិឞ្ដម៑,
7 त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्चित केली असून त्यास तो “आज” हा एक असा दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दावीदाच्या द्वारे असे म्हणतो, “आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
ឥតិ ហេតោះ ស បុនរទ្យនាមកំ ទិនំ និរូប្យ ទីគ៌្ហកាលេ គតេៜបិ បូវ៌្វោក្តាំ វាចំ ទាយូទា កថយតិ, យថា, "អទ្យ យូយំ កថាំ តស្យ យទិ សំឝ្រោតុមិច្ឆថ, តហ៌ិ មា កុរុតេទានីំ កឋិនានិ មនាំសិ វះ។ "
8 कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला, तर देव दुसऱ्या दिवसाबद्दल पुन्हा बोलला नसता.
អបរំ យិហោឝូយោ យទិ តាន៑ វ្យឝ្រាមយិឞ្យត៑ តហ៌ិ តតះ បរម៑ អបរស្យ ទិនស្យ វាគ៑ ឦឝ្វរេណ នាកថយិឞ្យត។
9 म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही विसाव्याचा दिवस आहे.
អត ឦឝ្វរស្យ ប្រជាភិះ កត៌្តវ្យ ឯកោ វិឝ្រាមស្តិឞ្ឋតិ។
10 १० कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वतःच्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता.
អបរម៑ ឦឝ្វរោ យទ្វត៑ ស្វក្ឫតកម៌្មភ្យោ វិឝឝ្រាម តទ្វត៑ តស្យ វិឝ្រាមស្ថានំ ប្រវិឞ្ដោ ជនោៜបិ ស្វក្ឫតកម៌្មភ្យោ វិឝ្រាម្យតិ។
11 ११ म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
អតោ វយំ តទ៑ វិឝ្រាមស្ថានំ ប្រវេឞ្ដុំ យតាមហៃ, តទវិឝ្វាសោទាហរណេន កោៜបិ ន បតតុ។
12 १२ कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांची पारख करणारे असे आहे.
ឦឝ្វរស្យ វាទោៜមរះ ប្រភាវវិឝិឞ្ដឝ្ច សវ៌្វស្មាទ៑ ទ្វិធារខង្គាទបិ តីក្ឞ្ណះ, អបរំ ប្រាណាត្មនោ រ្គ្រន្ថិមជ្ជយោឝ្ច បរិភេទាយ វិច្ឆេទការី មនសឝ្ច សង្កល្បានាម៑ អភិប្រេតានាញ្ច វិចារកះ។
13 १३ आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्यापाशी आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.
អបរំ យស្យ សមីបេ ស្វីយា ស្វីយា កថាស្មាភិះ កថយិតវ្យា តស្យាគោចរះ កោៜបិ ប្រាណី នាស្តិ តស្យ ទ្ឫឞ្ដៅ សវ៌្វមេវានាវ្ឫតំ ប្រកាឝិតញ្ចាស្តេ។
14 १४ म्हणून, ज्याअर्थी आम्हास येशू देवाचा पुत्र हा महान महायाजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या.
អបរំ យ ឧច្ចតមំ ស្វគ៌ំ ប្រវិឞ្ដ ឯតាទ្ឫឝ ឯកោ វ្យក្តិរត៌្ហត ឦឝ្វរស្យ បុត្រោ យីឝុរស្មាកំ មហាយាជកោៜស្តិ, អតោ ហេតោ រ្វយំ ធម៌្មប្រតិជ្ញាំ ទ្ឫឍម៑ អាលម្ពាមហៃ។
15 १५ कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला.
អស្មាកំ យោ មហាយាជកោ ៜស្តិ សោៜស្មាកំ ទុះខៃ រ្ទុះខិតោ ភវិតុម៑ អឝក្តោ នហិ កិន្តុ បាបំ វិនា សវ៌្វវិឞយេ វយមិវ បរីក្ឞិតះ។
16 १६ तर मग आपण देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हास दया व कृपा प्राप्त व्हावी.
អតឯវ ក្ឫបាំ គ្រហីតុំ ប្រយោជនីយោបការាត៌្ហម៑ អនុគ្រហំ ប្រាប្តុញ្ច វយម៑ ឧត្សាហេនានុគ្រហសិំហាសនស្យ សមីបំ យាមះ។

< इब्री 4 >