< 1 Timoteus 4 >

1 Men Anden segjer klårleg, at i dei komande tider skal sume falla frå trui og halda seg til dårande ånder og lærdomar av djevlar
देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
2 ved hykling av falske lærarar, som er brennemerkte i sitt eige samvit,
ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील.
3 som forbyd å gifta seg og påbyd å halda seg frå mat, som Gud hev skapt til å verta motteken med takk av deim som trur og hev lært sanningi å kjenna.
ते लोकांस लग्न करण्यास मना करतील व जे अन्न विश्वास ठेवणाऱ्यांनी व खरेपण जाणणाऱ्यांनी उपकारस्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वांत आणली ती वर्ज्य करावी असे सांगतील.
4 For all Guds skapning er god, og inkje er til å vanda, når det vert motteke med takk;
तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीही वर्ज्य नाही.
5 for det vert helga med Guds ord og bøn.
कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.
6 Når du lærer brørne dette, so er du ein god Jesu Kristi tenar, med di du vert uppfødd med ordi av trui og den gode lærdomen som du hev fylgt.
जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
7 Men haldt deg frå dei vanheilage og kjerringslege eventyr, men tem deg derimot upp i gudlegdom!
परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस, तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.
8 For den likamlege tamen er gagnleg til lite, men gudlegdom er gagnleg til alt; med di han hev lovnad for det livet som no er og for det som kjem.
कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.
9 Det ord er sant og all fagning verdt.
हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वदा स्वीकारावयास योग्य आहे.
10 For difor både arbeider me og lid hæding, for di me hev sett vår von til den livande Gud, som er frelsar for alle menneskje, mest dei truande.
१०याकरिता आम्ही श्रम व खटपट करतो कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.
11 Dette skal du bjoda og læra.
११या गोष्टी आज्ञारूपाने सांग आणि शिकव.
12 Lat ingen vanvyrda deg for din ungdom, men ver eit fyredøme for dei truande i tale, i ferd, i kjærleik, i tru, i reinleik!
१२कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.
13 Til dess eg kjem, so legg vinn på fyrelesnaden, på påminningi, på læra!
१३मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव.
14 Vanskøyt ikkje den nådegåva som er i deg, som vart gjevi deg ved profetord med handpåleggjing av dei eldste!
१४तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याचा वेळेस संदेशाच्या द्वारे देण्यात आलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नको.
15 Tenk på dette, liv i dette, so din framgang kann vera kunnig for alle!
१५या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यामध्ये पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांस दिसून यावी.
16 Gjev agt på deg sjølv og på læra, haldt ved med det! for når du det gjer, skal du frelsa både deg sjølv og deim som høyrer deg.
१६आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे चुकीच्या शिक्षणापासून बचाव करशील.

< 1 Timoteus 4 >