< Apostlenes-gjerninge 18 >

1 So drog han frå Aten og kom til Korint.
नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला.
2 Der fann han ein jøde med namnet Akvilas, som var fødd i Pontus og nyst var komen frå Italia, og Priskilla, kona hans; for Klaudius hadde påbode at alle jødar skulde hava seg burt frå Rom; og han gjekk til deim,
करिंथमध्ये पौल एका यहूदी मनुष्यास भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते, तो पंत प्रांतातील रहिवासी होता, आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्याने काढला होता, पौल त्यांना भेटावयास गेला.
3 og då han dreiv same handverket, budde han hjå deim og arbeidde der; for dei var tjeldmakarar av handverk.
पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते, तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला.
4 Men han heldt samtalar i synagoga kvar kviledag og yvertydde jødar og grækarar.
प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे, आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.
5 Då so Silas og Timoteus kom ned frå Makedonia, var Paulus fullt uppteken med å læra, med di han vitna for jødarne, at Jesus er Messias.
जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल यहूदी लोकांस उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला, येशू हाच ख्रिस्त आहे. अशी साक्ष देऊ लागला.
6 Men då dei stod imot og spotta, riste han dusti av klædi sine og sagde til deim: «Dykkar blod kome yver dykkar hovud! Eg er rein; frå denne stundi gjeng eg til heidningarne.»
परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला, त्यास यहूदी लोक वाईट रीतीने बोलले, तेव्हा आपला निषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले, तो यहूदी लोकांस म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी निर्दोष आहे, येथून पुढे मी परराष्ट्रीय लोकांकडेच जाईन.”
7 So gjekk han burt derifrå og kom i huset til ein mann med namnet Justus, som dyrka Gud, og hans hus låg vegg i vegg med synagoga.
पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाचा देवाचा उपासक याच्या घरी गेला.
8 Men Krispus, synagoge-forstandaren, kom til tru på Herren med heile sitt hus; og mange av folket i Korint kom til tru då dei høyrde honom, og let seg døypa.
त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता, क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.
9 Og Herren sagde til Paulus i ei syn um natti: «Ottast ikkje, men tala, og teg ikkje!
एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, “घाबरु नको, बोलत राहा, शांत राहू नको.
10 For eg er med deg, og ingen skal leggja hand på deg og gjera deg vondt; for eg hev mykje folk i denne byen.»
१०मी तुझ्याबरोबर आहे, कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.”
11 Og han vart buande der eit år og seks månader, og lærde Guds ord millom deim.
११म्हणून पौल तेथे दीड वर्षे देवाचे वचन त्या लोकांस शिकवीत राहिला.
12 Men då Gallio var landshovding yver Akaia, reiste jødarne seg alle som ein mot Paulus og førde ham fram for domstolen og sagde.
१२जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुद्ध एकत्र आले आणि त्यास न्यायासनापुढे उभे केले.
13 «Denne set folk upp til å dyrka Gud imot lovi.»
१३यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांस देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
14 Då Paulus vilde opna munnen, sagde Gallio til jødarne: «Var det nokor illgjerning eller noko vondt ustykke, de jødar, då hadde eg med god grunn høyrt på dykk med tolmod.
१४पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकांस म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते.
15 Men er det stridsspursmål um ei læra og um namn og um dykkar lov, so stell med det sjølve! for i dei ting vil ikkje eg vera domar.»
१५परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे, त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा, अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो.”
16 Og so dreiv han deim burt frå domstolen.
१६मग गल्लियोने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले.
17 Men då tok dei alle fat på Sostenes, synagoge-forstandaren, og slo honom midt for domstolen. Og Gallio brydde seg ikkje noko um alt dette.
१७मग त्या सर्वांनी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला न्यायासनासमोर मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही.
18 Paulus vart der endå ei lang tid; so bad han velfar med brørne og siglde burt til Syria, og Priskilla og Akvilas i fylgje med honom, etter at han fyrst i Kenkreæ hadde klypt håret sitt, for han hadde ein lovnad på seg.
१८पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला, नंतर तो निघाला व सिरीया प्रांताला समुद्रमार्गे गेला आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विला ही दोघे होती, पौलाने किंख्रिया शहरात आपल्या डोक्याचे मुंडण केले, कारण त्याने नवस केला होता.
19 So kom dei til Efesus; der let han dei andre vera att, og sjølv gjekk han inn i synagoga og gav seg i samtale med jødarne.
१९मग ते इफिस येथे आले, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विला यांना तेथे सोडले, तो सभास्थानात गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला.
20 Då dei bad honom vera der lenger, samtykte han ikkje,
२०जेव्हा त्यांनी त्यास तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही.
21 men baud deim velfar og sagde: «Eg skal koma til dykk att, um Gud so vil.» So siglde han frå Efesus,
२१परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला.
22 og han kom til Cæsarea, og han drog upp og helsa på kyrkjelyden og drog so ned til Antiokia.
२२जेव्हा पौल कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरूशलेम शहरास गेला आणि मंडळीला भेटला, मग तो खाली अंत्युखियाला गेला.
23 Då han hadde vore der ei tid, drog han ut og for gjenom Galatarlandet og Frygia frå ende til ende og styrkte alle læresveinarne.
२३तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला, त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.
24 Men ein jøde med namnet Apollos, fødd i Aleksandria, ein ordhag mann, kom til Efesus; han var sterk i skrifterne.
२४अपुल्लो नावाचा एक यहूदी होता, तो आलेक्सांद्र शहरात जन्मला होता, तो उच्च शिक्षित होता, तो इफिस येथे आला, त्यास शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते.
25 Han var upplærd um Herrens veg, og brennande i åndi tala og lærde han grannleg um Herren, endå han kjende berre Johannes-dåpen.
२५परमेश्वराच्या मार्गाचे शिक्षण त्यास देण्यात आले होते, तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्यास फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता.
26 Og han tok til å tala frimodigt i synagoga. Då Priskilla og Akvilas høyrde honom, tok dei honom til seg og greidde Guds veg grannare ut for honom.
२६तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रस्किला व अक्विला ह्यांनी त्यांचे भाषण ऐकूण त्यास जवळ बोलावून घेतले व त्यास देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.
27 Då han so vilde draga derifrå til Akaia, talde brørne honom til og skreiv til læresveinarne um å taka imot honom. Og då han kom dit, var han ved Guds nåde til stor hjelp for dei truande.
२७अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्यास उत्तेजन दिले आणि तेथील येशूच्या शिष्यांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले, जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली.
28 For med kraft målbatt han jødarne openberrleg for alle, med di han synte ut or skrifterne at Jesus er Messias.
२८जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांस फार जोरदारपणे पराभूत केले आणि पवित्र शास्त्रलेखाच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.

< Apostlenes-gjerninge 18 >