< Dela apostolska 27 >

1 I kao što bi odreðeno da idemo u Talijansku, predaše i Pavla i druge neke sužnje kapetanu, po imenu Juliju, od æesareve èete.
जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरवले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले, युल्य हा अगस्तस सेनेचा एक अधिकारी होता.
2 A kad uðosmo u laðu Adramitsku da plovimo u Azijska mjesta, otiskosmo se; i s nama bješe Aristarh Maæedonac iz Soluna.
अद्रमुत्तिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो, हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते, आम्ही या जहाजातून प्रवासास निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.
3 I drugi dan doðosmo u Sidon. I Julije držaše Pavla lijepo, i dopusti mu da odlazi k svojijem prijateljima i da ga poslužuju.
दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहचलो, युल्य पौलाशी फार चांगला वागला, पौलाच्या मित्रांना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली.
4 I odande odvezavši se doplovismo u Kipar, jer vjetrovi bijahu protivni.
तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता.
5 I preplovivši puèinu Kilikijsku i Pamfilijsku doðosmo u Miru Likijsku.
किलकिया व पंफुलिया प्रांताजवळच्या समुद्राला पार करून लुक्या प्रांतातील मुर्या बंदरात पोहचलो.
6 I ondje našavši kapetan laðu Aleksandrijsku koja plovi u Talijansku, metnu nas u nju.
तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्सांद्रीयाचे एक जहाज आढळले, त्याने आम्हास त्या जहजात बसविले.
7 I plovivši mnogo dana sporo, i jedva došavši prema Knidu, jer nam vjetar ne dadijaše, doplovismo pod Krit kod Salmone.
आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो, कनिदा शहरापर्यंत येण्यासाठी आम्हास फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता, आम्हास पुढे जाता येईना, म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोन शहराच्याच्या समोरच्या बाजूस गेलो.
8 I jedva se vozeæi pored kraja, doðosmo na jedno mjesto koje se zove Dobra Pristaništa, kod kojega blizu bješe grad Laseja.
यापुढे आमचे जहाज क्रेत बेटाच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणीतून सुरक्षित बंदर येथे पोहोचले, तेथे जवळच लसया नगर होते.
9 A pošto proðe mnogo vremena, i veæ plovljenje ne bijaše bez straha, jer i post veæ bješe prošao, svjetovaše Pavle
बराच वेळ वाया गेला होता आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते, कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता, तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला, पौल म्हणाला,
10 Govoreæi im: ljudi! vidim da æe plovljenje biti s mukom i velikom štetom ne samo tovara i laðe nego i duša našijeh.
१०“पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल.”
11 Ali kapetan posluša veæma kormanoša i gospodara od laðe negoli Pavlove rijeèi.
११परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता.
12 A ne buduæi pristanište zgodno za zimovnik, svjetovahu mnogi da se odvezu odande, ne bi li kako mogli doæi do Finika, i ondje da zimuju u pristaništu Kritskom, koje gleda k jugu i k zapadu.
१२परंतु हे सुरक्षित म्हंटलेले बंदर हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते, म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले.
13 I kad dunu jug, mišljahu da im se volja ispuni, i podignuvši jedra plovljahu pokraj Krita.
१३तेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारू हाकारीत जाऊ लागले, जहाजावरच्या लोकांस वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हास पाहिजे होते व तसेच ते वाहत आहे.
14 Ali ne zadugo potom dunu nasuprot njemu buran vjetar koji se zove Evroklidon.
१४परंतु लवकरच क्रेत बेटावरून ‘ईशान्येचे’ म्हंटलेले वादळी वारे वाहू लागले.
15 A kad se laða ote, i ne mogaše se vjetru protiviti, predadosmo je valovima i nošahu nas.
१५आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले व त्यास पुढे जाता येईना, तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले.
16 A kad proðosmo mimo jedno ostrvo koje se zove Klauda, jedva mogosmo udržati èamac,
१६मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो, मग थोड्या खटपटीनंतर जीवन रक्षक होडीवर उचलून घेतली.
17 Koji izvukavši, svakojako pomagahu, te ga privezasmo odozdo za laðu; a bojeæi se da ne udari na prud, spustismo jedra, i tako se plavljasmo.
१७जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले, जहाज वाळू असलेल्या सूर्ती नावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले, तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.
18 A kad nam veoma dosaðivaše bura sjutradan izbacivahu tovare.
१८जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले.
19 I u treæi dan svojima rukama izbacismo alat laðarski.
१९तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली.
20 A kad se ni sunce ni zvijezde za mnogo dana ne pokazaše, i bura ne mala navalila, bijaše propao sav nad da æemo se izbaviti.
२०बरेच दिवस आम्हास सूर्य किंवा तारे दिसले नाहीत, वादळ फारच भयंकर होते, आम्ही आमच्या तरण्याची सर्व आशा सोडून दिली, आम्ही मरणार असे आम्हास वाटू लागले.
21 I kad se zadugo nije jelo, onda Pavle stavši preda njih reèe: trebaše dakle, o ljudi! poslušati mene, i ne otiskivati se od Krita, i ne imati ove muke i štete.
२१बराच काळपर्यंत लोकांस उपवास घडल्यावर, मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरून मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता, म्हणजे हा त्रास व ही हानी तुम्हास टाळता आली असती.”
22 I evo sad vas molim da budete dobre volje: jer nijedna duša od vas neæe propasti osim laðe;
२२पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंती आहे, कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही, आपले जहाज मात्र गमवावे लागेल.
23 Jer u ovu noæ stade preda me anðeo Boga kojega sam ja i kome služim,
२३मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.
24 Govoreæi: ne boj se, Pavle! valja ti doæi pred æesara; i evo ti darova Bog sve koji se voze s tobom.
२४आणि तो दूत म्हणाला, “पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे, तुझ्याबरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत.
25 Zato ne bojte se, ljudi; jer vjerujem Bogu da æe tako biti kao što mi bi reèeno.
२५तेव्हा गृहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे देवाने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे.
26 Ali valja nam doæi na jedno ostrvo.
२६परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरून थांबावे लागले.”
27 A kad bi èetrnaesta noæ, i mi se u ponoæi plavljasmo po Adrijanskoj puèini, pomisliše laðari da se približuju k nekakvoj zemlji.
२७चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला.
28 I izmjerivši dubinu naðoše dvadeset hvati; i prošavši malo opet izmjeriše, i naðoše petnaest hvati.
२८त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती चाळीस मीटर भरली, आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती तीस मीटर भरली.
29 Onda bojeæi se da kako ne udare na prudovita mjesta baciše sa stražnjega kraja laðe èetiri lengera, pa se moljasmo Bogu da svane.
२९ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करीत वाट पाहू लागले.
30 A kad laðari gledahu da pobjegnu iz laðe, i spustiše èamac u more izgovarajuæi se kao da hoæe s prednjega kraja da spuste lengere,
३०खलाशांनी जहाजातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवन रक्षक होड्या समुद्रात टाकल्या.
31 Reèe Pavle kapetanu i vojnicima: ako ovi ne ostanu u laði, vi ne možete živi ostati.
३१परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.”
32 Tada vojnici odrezaše uža na èamcu i pustiše ga te pade.
३२यावर शिपायांनी जीवन रक्षक होड्यांचे दोर कापून टाकले आणि त्याखाली पाण्यात पडू दिल्या.
33 A kad šæaše da svane, moljaše Pavle sve da jedu, govoreæi: èetrnaesti je dan danas kako èekate i ne jeduæi živite ništa ne okusivši.
३३पहाट होण्याअगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला, तो म्हणाला, “आज चौदावा दिवस आहे, तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही, अन्नाचा कणही खाल्ला नाही.
34 Zato vas molim da jedete: jer je to za vaše zdravlje. A ni jednome od vas dlaka s glave neæe otpasti.
३४तुम्ही थोडे तरी खा, कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे, तुम्ही खावे अशी मी तुम्हास विनंती करतो, तुमच्यापैकी कोणाच्या केसासही धक्का लागणार नाही.”
35 I rekavši ovo uze hljeb, i dade hvalu Bogu pred svima, i prelomivši stade jesti.
३५असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला.
36 Onda se svi razveselivši i oni jedoše.
३६ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले.
37 A u laði bijaše nas duša svega dvjesta i sedamdeset i šest.
३७आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शहात्तर लोक होतो.
38 I nasitivši se jela, oblakšaše laðu izbacivši pšenicu u more.
३८त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्याल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.
39 A kad bi dan ne poznavahu zemlje; nego ugledaše nekakav zaliv s pijeskom, na koji se dogovoriše, ako bude moguæe, da izvuku laðu.
३९दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही, परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली, म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरवले.
40 I podignuvši lengere vožahu se po moru, i odriješivši uža na krmama, i raširivši malo jedro prema vjetriæu koji duhaše, vožasmo se kraju.
४०म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले, त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या, नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीड वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले.
41 A kad doðosmo kao na jedan jezik, gdje se more kao razdjeljuje, nasadi se laða; i prednji kraj, koji se nasadi, osta tvrd da se ne može pomaknuti, a krma se razbijaše od sile valova.
४१परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले, तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.
42 A vojnici se dogovoriše da pobiju sužnje, da koji ne ispliva i ne uteèe.
४२तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरवले, यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये.
43 Ali kapetan želeæi saèuvati Pavla zabrani njihov dogovor, i zapovjedi onima koji znadu plivati da iskoèe najprije, i da iziðu na zemlju;
४३परंतु शताधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली.
44 A ostali jedni na daskama a jedni na èemu od laðe. I tako iziðoše svi živi na zemlju.
४४बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले, अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरुपपणे भूमीवर पोहोचले.

< Dela apostolska 27 >