< Luki 12 >

1 Kad se na njih skupiše hiljade naroda da stadoše gaziti jedan drugoga, onda poèe najprije govoriti uèenicima svojijem: èuvajte se kvasca farisejskoga, koji je licemjerje.
आणि त्यादरम्यान हजारो लोकांचा समुदाय जमला होता आणि एवढा की ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोललाः “परूश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी जपा.
2 Jer ništa nije sakriveno što se neæe otkriti, ni tajno što se neæe doznati;
उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही.
3 Jer što u mraku rekoste, èuæe se na vidjelu; i što na uho šaptaste u klijetima, propovijedaæe se na krovovima.
म्हणून तुम्ही जे काही अंधारात बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि तुम्ही कोणाच्या कानात जे काही एकांतात सांगाल ते घराच्या छतावरुन घोषित केले जाईल.”
4 Ali vam kažem, prijateljima svojijem: ne bojte se od onijeh koji ubijaju tijelo i potom ne mogu ništa više uèiniti.
“परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हास सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नका, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही.
5 Nego æu vam kazati koga da se bojite: bojte se onoga koji ima vlast pošto ubije baciti u pakao; da, kažem vam, onoga se bojte. (Geenna g1067)
तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सांगतो. तुम्हास ठार मारल्या यानंतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा. (Geenna g1067)
6 Ne prodaje li se pet vrabaca za dva dinara? i nijedan od njih nije zaboravljen pred Bogom.
पाच चिमण्या दोन नाण्यांना विकतात की नाही? तरी त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही.
7 A u vas je i kosa na glavi izbrojena. Ne bojte se dakle; vi ste bolji od mnogo vrabaca.
पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मूल्य जास्त आहे.
8 Nego vam kažem: koji god prizna mene pred ljudima priznaæe i sin èovjeèij njega pred anðelima Božijim;
जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या प्रत्येक मनुष्यास देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील.
9 A koji se odreèe mene pred ljudima njega æe se odreæi pred anðelima Božijim.
परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल.
10 I svaki koji reèe rijeè na sina èovjeèijega oprostiæe mu se, a koji huli na svetoga Duha neæe mu se oprostiti.
१०प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलतो, त्यास क्षमा केली जाईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्यास क्षमा केली जाणार नाही.
11 A kad vas dovedu u zbornice i na sudove i pred poglavare, ne brinite se kako æete ili šta odgovoriti, ili šta æete kazati;
११जेव्हा ते तुम्हास सभास्थाने, राज्यकर्ते व अधिकारी यांच्यासमोर धरुन आणतील तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका.
12 Jer æe vas sveti Duh nauèiti u onaj èas šta treba reæi.
१२कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्याचवेळी तुम्हास शिकवील.”
13 Reèe mu pak neki iz naroda: uèitelju! reci bratu mojemu da podijeli sa mnom dostojanje.
१३नंतर लोकसमुदायातील एकजण त्यास म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!”
14 A on mu reèe: èovjeèe! ko je mene postavio sudijom ili kmetom nad vama?
१४परंतु येशू त्यास म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?”
15 A njima reèe: gledajte i èuvajte se od lakomstva; jer niko ne živi onijem što je suviše bogat.
१५मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही.”
16 Kaza im pak prièu govoreæi: u jednoga bogatog èovjeka rodi njiva.
१६नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या शेतजमिनीत फार उत्तम पीक आले.
17 I mišljaše u sebi govoreæi: šta æu èiniti? nemam u što sabrati svoje ljetine.
१७तो स्वतःशी विचार करून असे म्हणाला, ‘मी काय करू, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’
18 I reèe: evo ovo æu èiniti: pokvariæu žitnice svoje i naèiniæu veæe; i ondje æu sabrati sva svoja žita i dobro svoje;
१८मग तो असे म्हणाला, ‘मी आता असे करतो, मी माझी धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीतो, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन’
19 I kazaæu duši svojoj: dušo! imaš mnogo imanje na mnogo godina; poèivaj, jedi, pij, veseli se.
१९आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’
20 A Bog njemu reèe: bezumnièe! ovu noæ uzeæe dušu tvoju od tebe; a što si pripravio èije æe biti?
२०पण देव त्यास म्हणतो, ‘अरे मूर्खा, जर आज तुझा जीव गेला तर तू साठवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’
21 Tako biva onome koji sebi teèe blago a ne bogati se u Boga.
२१जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”
22 A uèenicima svojijem reèe: zato vam kažem: ne brinite se dušom svojom šta æete jesti; ni tijelom u što æete se obuæi:
२२मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “म्हणून मी तुम्हास सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका.
23 Duša je pretežnija od jela i tijelo od odijela.
२३कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर महत्त्वाचे आहे.
24 Pogledajte gavrane kako ne siju, ni žanju, koji nemaju podruma ni žitnica, i Bog ih hrani: a koliko ste vi pretežniji od ptica?
२४कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात!
25 A ko od vas brinuæi se može primaknuti rastu svojemu lakat jedan?
२५चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास कोण समर्थ आहे?
26 A kad ni najmanje što ne možete, zašto se brinete za ostalo?
२६ज्याअर्थी तुम्हीही सर्वात लहान गोष्ट करू शकत नाही, तर इतर गोष्टींविषयीची चिंता का करता?
27 Pogledajte ljiljane kako rastu: ne trude se, niti predu; ali ja vam kažem da ni Solomun u svoj slavi svojoj ne obuèe se kao jedan od njih.
२७रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हास सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही सजला नव्हता.
28 A kad travu po polju, koja danas jest a sjutra se u peæ baca, Bog tako odijeva, akamoli vas, malovjerni!
२८तर, जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हास तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय!
29 I vi ne ištite šta æete jesti ili šta æete piti, i ne brinite se;
२९तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका.
30 Jer ovo sve ištu i neznabošci ovoga svijeta; a otac vaš zna da vama treba ovo.
३०कारण परराष्ट्री हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची तुम्हास गरज आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे.
31 Nego ištite carstva Božijega, i ovo æe vam se sve dodati.
३१त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हास दिल्या जातील.
32 Ne boj se, malo stado! jer bi volja vašega oca da vam da carstvo.
३२हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो.
33 Prodajite što imate i dajite milostinju; naèinite sebi torbe koje neæe ovetšati, haznu koja se nikad neæe isprazniti, na nebesima, gdje se lupež ne prikuèuje niti moljac jede.
३३तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा. जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी स्वर्गात बनवा. तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही.
34 Jer gdje je vaše blago ondje æe biti i srce vaše.
३४कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
35 Neka budu vaša bedra zapregnuta i svijeæe zapaljene;
३५तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या.
36 I vi kao ljudi koji èekaju gospodara svojega kad se vrati sa svadbe da mu odmah otvore kako doðe i kucne.
३६लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून, तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा.
37 Blago onijem slugama koje naðe gospodar kad doðe a oni straže. Zaista vam kažem da æe se zapregnuti, i posadiæe ih, i pristupiæe te æe im služiti.
३७मालक परत आल्यावर जे नोकर त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील.
38 I ako doðe u drugu stražu, i u treæu stražu doðe, i naðe ih tako, blago onijem slugama.
३८तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो, जर ते नोकर त्यास तयारीत आढळतील तर ते धन्य.
39 Ali ovo znajte: kad bi znao domaæin u koji æe èas doæi lupež, èuvao bi i ne bi dao potkopati kuæe svoje.
३९परंतु याविषयी खात्री बाळगा; चोर केव्हा येणार हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर त्याने आपले घर त्यास फोडू दिले नसते.
40 I vi dakle budite gotovi; jer u koji èas ne mislite doæi æe sin èovjeèij.
४०तुम्हीही तयार असा कारण तुम्हास वाटत नाही अश्या क्षणी? मनुष्याचा पुत्र येईल.”
41 A Petar mu reèe: Gospode! govoriš li nama ovu prièu ili svima?
४१मग पेत्र म्हणाला, “प्रभू, तुम्ही हा दाखला आम्हासच सांगत आहात की सर्वांना?”
42 A Gospod reèe: ko je dakle taj vjerni i mudri pristav kojega postavi gospodar nad èeljadi svojom da im daje hranu na obrok?
४२तेव्हा प्रभू म्हणाला, “प्रभू त्याच्या इतर नोकरांना त्यांचे धान्य योग्यवेळी देण्यासाठी ज्याची नेमणूक करील असा व विश्वासू कारभारी कोण आहे?
43 Blago tome sluzi kojega došavši gospodar njegov naðe da izvršuje tako.
४३त्याचा मालक येईल त्यावेळी असे करतांना जो नोकर त्यास आढळेल तो धन्य.
44 Zaista vam kažem: nad svijem svojijem imanjem postaviæe ga.
४४मी तुम्हास खरे सांगतो, मालक त्यास त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील.
45 Ako li reèe sluga u srcu svojemu: neæe moj gospodar još zadugo doæi; i stane biti sluge i sluškinje, i jesti i piti, i opijati se;
४५पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार उशीर करत आहे,’ आणि मग तो त्याच्या स्त्री व पुरूष नोकरांना मारहाण करायला व खाण्यापिण्यास सुरुवात करतो व झिंगतो,
46 Doæi æe gospodar toga sluge u dan kad se ne nada, i u èas kad ne misli, i rasjeæi æe ga, i dijel njegov metnuæe s nevjernima.
४६तर तो नोकर वाट पाहत नाही त्यादिवशी आणि त्यास माहीत नाही तेव्हा त्याचा मालक येईल व त्यास कापून त्याचे तुकडे करील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा ठेवील.
47 A onaj sluga koji zna volju gospodara svojega, i nije se pripravio, niti uèinio po volji njegovoj, biæe vrlo bijen;
४७आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल.
48 A koji ne zna pa zasluži boj, biæe malo bijen. Kome je god mnogo dano mnogo æe se iskati od njega; a kome predaše najviše najviše æe iskati od njega.
४८परंतु ज्याला माहीती नव्हते म्हणून त्याने मालकाला न आवडणारे असे कृत्य जर नोकराने केले असेल तर त्यास कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल. ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल.”
49 Ja sam došao da bacim oganj na zemlju; i kako bi mi se htjelo da se veæ zapalio!
४९“मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आणि जर ती अगोदरच पेटलेली असेल तर मग मला आणखी काय पाहीजे?
50 Ali se meni valja krstiti krštenjem, i kako mi je teško dok se ne svrši!
५०मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे!
51 Mislite li da sam ja došao da dam mir na zemlju? Ne, kažem vam, nego razdor.
५१मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे, असे तुम्हास वाटते का? नाही, मी तुम्हास सांगतो, मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे.
52 Jer æe otsele pet u jednoj kuæi biti razdijeljeni, ustaæe tri na dva, i dva na tri.
५२मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकांविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल.
53 Ustaæe otac na sina i sin na oca; mati na kæer i kæi na mater; svekrva na snahu svoju i snaha na svekrvu svoju.
५३त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल, आईविरुद्ध मुलगी व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल, सासूविरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल.
54 A narodu govoraše: kad vidite oblak gdje se diže od zapada odmah kažete: biæe dažd; i biva tako.
५४तो लोकसमुदायाला म्हणाला, जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, पाऊस पडेल आणि तसेच घडते.
55 I kad vidite jug gdje duva kažete: biæe vruæina; i biva.
५५जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल आणि तसेच घडते.
56 Licemjeri! lice neba i zemlje umijete poznavati, a vremena ovoga kako ne poznajete?
५६अहो ढोंग्यांनो! तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील चिन्हांची लक्षणे पारखता येतात, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हास का काढता येत नाही काय?
57 Zašto pak i sami od sebe ne sudite pravedno?
५७आणि तुम्ही तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही स्वतःचे स्वतःच का ठरवीत नाही?
58 Jer kad ideš sa svojijem suparnikom knezu, gledaj ne bi li se na putu s njim poravnao da te ne pritegne sudiji, i sudija da te ne preda sluzi, i sluga da te ne baci u tamnicu.
५८तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो तुम्हास न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुम्हास दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील आणि अधिकारी तुम्हास तुरुंगात टाकील.
59 Kažem ti: neæeš odande iziæi dok ne daš i pošljednjega dinara.
५९मी तुम्हास सांगतो, अगदी शेवटली दमडी न दमडी फेडीपर्यंत तुम्ही तेथून सुटणारच नाही.”

< Luki 12 >