< Mateju 24 >

1 I izišavši Isus iðaše od crkve, i pristupiše k njemu uèenici njegovi da mu pokažu graðevinu crkvenu.
मग येशू परमेश्वराच्या भवनातून बाहेर येऊन पुढे जात होता, त्याचे शिष्य त्याच्याकडे त्यास परमेश्वराचे भवन दाखवायला आले.
2 A Isus reèe im: ne vidite li sve ovo? Zaista vam kažem: neæe ostati ovdje ni kamen na kamenu koji se neæe razmetnuti.
परंतु त्याने, त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही या सर्व गोष्टी पाहता ना? आता, मी तुम्हास खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहू दिला जाणार नाही.”
3 A kad sjeðaše na gori Maslinskoj pristupiše k njemu uèenici nasamo govoreæi: kaži nam kad æe to biti? i kakav je znak tvojega dolaska i pošljetka vijeka? (aiōn g165)
मग तो जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात येऊन म्हणाले, “आम्हास सांगा की या गोष्टी कधी होतील? आपल्या येण्याचा आणि युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या चिन्हावरून ओळखावे?” (aiōn g165)
4 I odgovarajuæi Isus reèe im: èuvajte se da vas ko ne prevari.
येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळ कोणीही तुम्हास फसवू नये.
5 Jer æe mnogi doæi u ime moje govoreæi: ja sam Hristos. I mnoge æe prevariti.
कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांस फसवतील.
6 Èuæete ratove i glasove o ratovima. Gledajte da se ne uplašite; jer treba da to sve bude. Ali nije još tada pošljedak.
सांभाळ, तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही.
7 Jer æe ustati narod na narod i carstvo na carstvo; i biæe gladi i pomori, i zemlja æe se tresti po svijetu.
कारण, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील.
8 A to je sve poèetak stradanja.
पण या सर्व गोष्टी प्रसूतीवेदनांची सुरूवात अशा आहेत.
9 Tada æe vas predati na muke, i pobiæe vas, i svi æe narodi omrznuti na vas imena mojega radi.
ते तुम्हास छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.
10 I tada æe se mnogi sablazniti, i drug druga izdaæe, i omrznuæe drug na druga.
१०मग पुष्कळांना अडथळा होईल. ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील.
11 I iziæi æe mnogi lažni proroci i prevariæe mnoge.
११अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील.
12 I što æe se bezakonje umnožiti, ohladnjeæe ljubav mnogijeh.
१२सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.
13 Ali koji pretrpi do kraja blago njemu.
१३पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल.
14 I propovjediæe se ovo jevanðelje o carstvu po svemu svijetu za svjedoèanstvo svijem narodima. I tada æe doæi pošljedak.
१४सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल.
15 Kad dakle ugledate mrzost opušæenja, o kojoj govori prorok Danilo, gdje stoji na mjestu svetome koji èita da razumije):
१५तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.)
16 Tada koji budu u Judeji neka bježe u gore;
१६त्यावेळी यहूदीया प्रांतातील लोकांनी डोंगरावर पळून जावे.
17 I koji bude na krovu da ne silazi uzeti što mu je u kuæi;
१७जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये.
18 I koji bude u polju da se ne vrati natrag da uzme haljine svoje.
१८जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी माघारी परत जाऊ नये.
19 A teško trudnima i dojilicama u te dane.
१९त्याकाळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अश्या स्त्रियांना फार कठीण जाईल.
20 Nego se molite Bogu da ne bude bježan vaša u zimu ni u subotu;
२०जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा थंडीचे दिवस अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा.
21 Jer æe biti nevolja velika kakova nije bila od postanja svijeta dosad niti æe biti;
२१कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्याकाळी येतील.
22 I da se oni dani ne skrate, niko ne bi ostao; ali izbranijeh radi skratiæe se dani oni.
२२आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील.
23 Tada ako vam ko reèe: evo ovdje je Hristos ili ondje, ne vjerujte.
२३त्यावेळी जर एखाद्याने तुम्हास म्हटले, पाहा! ख्रिस्त येथे आहे किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
24 Jer æe iziæi lažni hristosi i lažni proroci, i pokazaæe znake velike i èudesa da bi prevarili, ako bude moguæe, i izbrane.
२४खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
25 Eto vam kazah naprijed.
२५या गोष्टी होण्याअगोदरच मी तुम्हास सावध केले आहे.
26 Ako vam dakle reku: evo ga u pustinji, ne izlazite; evo ga u sobama, ne vjerujte.
२६एखादा मनुष्य तुम्हास सांगेल, पाहा, ख्रिस्त अरण्यात आहे. तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, तो आतल्या खोलीत आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
27 Jer kako što munja izlazi od istoka i pokazuje se do zapada, taki æe biti dolazak sina èovjeèijega.
२७मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वांना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील होईल.
28 Jer gdje je strvina onamo æe se i orlovi kupiti.
२८जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही जमतील.
29 I odmah æe po nevolji dana tijeh sunce pomrèati, i mjesec svoju svjetlost izgubiti, i zvijezde s neba spasti, i sile nebeske pokrenuti se.
२९सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.
30 I tada æe se pokazati znak sina èovjeèijega na nebu; i tada æe proplakati sva plemena na zemlji; i ugledaæe sina èovjeèijega gdje ide na oblacima nebeskima sa silom i slavom velikom.
३०तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील.
31 I poslaæe anðele svoje s velikijem glasom trubnijem; i sabraæe izbrane njegove od èetiri vjetra, od kraja do kraja nebesa.
३१मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
32 Od smokve nauèite se prièi: kad se veæ njezine grane pomlade i ulistaju, znate da je blizu ljeto.
३२अंजिराच्या झाडापासून शिका; अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हास कळते.
33 Tako i vi kad vidite sve ovo, znajte da je blizu kod vrata.
३३त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा हे जाणा की, तो दरवाजाजवळ आहे.
34 Zaista vam kažem: ovaj naraštaj neæe proæi dok se ovo sve ne zbude.
३४मी तुम्हास खरे सांगतो, या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
35 Nebo i zemlja proæi æe, ali rijeèi moje neæe proæi.
३५आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
36 A o danu tome i o èasu niko ne zna, ni anðeli nebeski, do otac moj sam.
३६पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही किंवा स्वतः पुत्रही जाणत नाही.
37 Jer kako što je bilo u vrijeme Nojevo tako æe biti i dolazak sina èovjeèijega.
३७नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल.
38 Jer kako što pred potopom jeðahu i pijahu, ženjahu se i udavahu do onoga dana kad Noje uðe u kovèeg,
३८तेव्हा जसे महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते, लोक लग्न करीत होते, लग्न करून देत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते.
39 I ne osjetiše dok ne doðe potop i odnese sve; tako æe biti i dolazak sina èovjeèijega.
३९आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.
40 Tada æe biti dva na njivi; jedan æe se uzeti, a drugi æe se ostaviti.
४०दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एकजण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील.
41 Dvije æe mljeti na žrvnjevima; jedna æe se uzeti, a druga æe se ostaviti.
४१दोन स्त्रिया जात्यावर दळीत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.
42 Stražite dakle, jer ne znate u koji æe èas doæi Gospod vaš.
४२म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे,
43 Ali ovo znajte: kad bi znao domaæin u koje æe vrijeme doæi lupež, èuvao bi i ne bi dao potkopati kuæe svoje.
४३हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते.
44 Zato i vi budite gotovi; jer u koji èas ne mislite doæi æe sin èovjeèij.
४४या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.
45 Ko je dakle taj vjerni i mudri sluga kojega je postavio gospodar njegov nad svojima domašnjima da im daje hranu na obrok?
४५तर ज्याला त्याच्या धन्याने आपल्या परिवाराला, त्यांना त्याचे अन्न वेळेवर द्याव म्हणून नेमल आहे तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे?
46 Blago tome sluzi kojega došavši gospodar njegov naðe da izvršuje tako.
४६जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य आहे!
47 Zaista vam kažem: postaviæe ga nad svijem imanjem svojim.
४७मी तुम्हास खरे सांगतो की, मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या चाकराची नेमणूक करील.
48 Ako li taj rðavi sluga reèe u srcu svome: neæe moj gospodar još zadugo doæi;
४८पण जर तो दुष्ट दास आपल्या मनात असे म्हणेल की, माझा धनी विलंब करीत आहे,
49 I poène biti svoje drugare, i jesti i piti s pijanicama;
४९तो चाकर इतर चाकरांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल.
50 Doæi æe gospodar toga sluge u dan kad se ne nada, i u èas kad ne misli.
५०आणि तो चाकर तयारीत नसेल तेव्हा मालक येईल.
51 I rasjeæi æe ga napola, i daæe mu platu kao i licemjerima; ondje æe biti plaè i škrgut zuba.
५१मग मालक त्या चाकराचे तुकडे करील. त्या चाकराला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील आणि त्याठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.

< Mateju 24 >