< Filemonu 1 >

1 Od Pavla, sužnja Isusa Hrista, i Timotija brata, Filimonu ljubaznome i pomagaèu našemu,
पौल, ख्रिस्त येशूचा बंदिवान आणि भाऊ तीमथ्य यांच्याकडून; आमचा प्रिय आणि सोबतीचा कामकरी फिलेमोन ह्यास,
2 I Apfiji, sestri ljubaznoj, i Arhipu, našemu drugaru u vojevanju, i domašnjoj tvojoj crkvi:
आणि बहीण अफ्फिया हिला व अर्खिप आमचा सोबतीचा शिपाई यास व तुझ्या घरी जी ख्रिस्ती मंडळी आहे तिला,
3 Blagodat vam i mir od Boga oca našega, i Gospoda Isusa Hrista.
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
4 Zahvaljujem Bogu svojemu spominjuæi te svagda u molitvama svojima,
मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून, माझ्या देवाची उपकारस्तुती करतो;
5 Èuvši ljubav tvoju i vjeru koju imaš ka Gospodu Isusu i k svima svetima:
कारण प्रभू येशूवर तुझा जो विश्वास आहे आणि सर्व पवित्रजनांवर तुझी जी प्रीती आहे, त्यांविषयी मी ऐकले आहे.
6 Da tvoja vjera, koju imamo zajedno, bude silna u poznanju svakoga dobra, koje imate u Hristu Isusu.
आणि मी अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील सहभागीपण कार्यकारी व्हावे.
7 Jer imam veliku radost i utjehu radi ljubavi tvoje, što srca svetijeh poèinuše kroza te, brate!
कारण तुझ्या प्रीतीमुळे मला फार आनंद व सांत्वन झाले आहे कारण हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांची अंतःकरणे समाधान पावली आहेत.
8 Toga radi ako i imam veliku slobodu u Hristu da ti zapovijedam što je potrebno,
याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे.
9 Ali opet molim ljubavi radi, ja koji sam takovi kao starac Pavle, a sad sužanj Isusa Hrista;
तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान.
10 Molimo te za svojega sina Onisima, kojega rodih u okovima svojima;
१०मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो.
11 Koji je tebi negda bio nepotreban, a sad je i tebi i meni vrlo potreban, kojega poslah tebi natrag;
११तो पूर्वी तुला निरुपयोगी होता पण आता, तुला व मला दोघांनाही उपयोगी आहे.
12 A ti ga, to jest, moje srce primi.
१२म्हणून मी त्यास म्हणजे माझ्या जिवालाच, तुझ्याकडे परत पाठवले आहे.
13 Ja ga šæadijah da zadržim kod sebe, da mi mjesto tebe posluži u okovima jevanðelja;
१३सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्यास जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.
14 Ali bez tvoje volje ne htjedoh ništa èiniti, da ne bi tvoje dobro bilo kao za nevolju, nego od dobre volje.
१४पण, तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.
15 Jer može biti da se za to rastade s tobom na neko vrijeme da ga dobiješ vjeèno, (aiōnios g166)
१५कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की, त्याने सर्वकाळासाठी तुझे व्हावे. (aiōnios g166)
16 Ne više kao roba, nego više od roba, brata ljubaznoga, a osobito meni, akamoli tebi, i po tijelu i u Gospodu.
१६त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे, मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर तो देहदृष्ट्या व प्रभूच्या ठायी ह्याहून कितीतरी अधिक प्रिय असावा.
17 Ako dakle držiš mene za svojega drugara, primi njega kao mene.
१७म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा स्वीकार कर.
18 Ako li ti u èemu skrivi, ili je dužan, to na mene zapiši.
१८त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या हिशोबी मांड.
19 Ja Pavle napisah rukom svojom, ja æu platiti: da ti ne reèem da si i sam sebe meni dužan.
१९मी पौल हे स्वहस्ते लिहित आहे; मी स्वतः त्याची फेड करीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण याचा उल्लेख मी करीत नाही.
20 Da brate! da imam korist od tebe u Gospodu, razveseli srce moje u Gospodu.
२०हे बंधू, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर; ख्रिस्ताच्या ठायी माझ्या जिवाला विश्रांती दे.
21 Uzdajuæi se u tvoju poslušnost napisah ti znajuæi da æeš još više uèiniti nego što govorim.
२१तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे; आणि मी जाणतो की, तू माझ्या म्हणण्यापेक्षा अधिकही करशील.
22 A uz to ugotovi mi i konak; jer se nadam da æu za vaše molitve biti darovan vama.
२२शिवाय माझ्यासाठी राहण्याची व्यवस्था करून ठेव कारण तुमच्या प्रार्थनांमुळे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी आशा मी करत आहे.
23 Pozdravlja te Epafras koji je sa mnom sužanj u Hristu Isusu,
२३ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास, हा तुला नमस्कार पाठवत आहे;
24 Marko, Aristarh, Dimas, Luka, pomagaèi moji.
२४आणि तसेच माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला नमस्कार सांगतात.
25 Blagodat Gospoda našega Isusa Hrista sa duhom vašijem. Amin.
२५आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्यासोबत असो. आमेन.

< Filemonu 1 >